खळबळजनक! शेगावात ११ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार! पोलिसांनी बलात्काऱ्याच्या तावडीतून सोडवले! आरोपी गजाआड

 
kraim
शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ११ व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २१ सप्टेंबर रोजी मुरारका कॉलेज मध्ये शिकणारी अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तपासाअंती मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे.

पिडीत मुलगी शेगाव येथील मुरारका कॉलेज मध्ये ११ व्या वर्गात शिकते. २१ सप्टेंबर ला सकाळी ११ वाजता ती कॉलेज मध्ये गेली होती. मात्र त्यानंतर संध्याकाळी ती परतली नव्हती. सगळीकडे शोध घेऊनही न सापडल्याने मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कुणीतरी अज्ञात आरोपीने माझ्या मुलीचे अपहरण केले असावे असा संशय मुलीच्या वडिलांनी तक्रारीत व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

  मध्यप्रदेशात घेऊन गेला होता...

  दरम्यान पोलीस तपासात एका युवकाने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकल्याचे समोर आले. गोड गोड बोलून युवकाने तिच्याशी जवळीक वाढवली होती. त्याच युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचे समोर आले. गोपनीय खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून जोडपे मध्यप्रदेशातील धाड जिल्ह्यात असल्याचे समोर आल्यावर ठाणेदार अनिल गोपाळ यांनी पोलिसांचे पथक पाठवले. तिथून अल्पवयीन मुलीची युवकाच्या तावडीतून सुटका केली व आरोपी युवकाला देखील ताब्यात घेतले. दरम्यान आरोपी युवकाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा जबाब मुलीने दिला. वैद्यकीय तपासणी अंती युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.