खळबळजनक! जिल्ह्यात नकली तृतीयपंथीयांची टोळी? असली आणि नकली मध्ये जानेफळात झाला राडा! जिल्ह्यातील सारे किन्नर जानेफळात एकवटले!

प्राप्त माहितीनुसार सपना व गजू हे जानेफळ परिसरात पैसे मागण्याचे काम करतात. आज आठवडी बाजारात पैसे मागण्यासाठी आलेल्या दोघा किन्नरांसोबत त्यांनी वाद घातला. हा आमचा एरिया आहे,आमच्या एरियात पैसे का मागता असे म्हणत सपना आणि गजू ने त्या किन्नरांना मारहाण केली. या प्रकारानंतर जिल्ह्यातील मलकापूर, खामगाव, बुलडाणा येथील किन्नर जानेफळ येथे एकवटले. मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
लहान मुलांना पळविनारी टोळी..?
दरम्यान जिल्ह्यात नकली लिंग परिवर्तन केलेले किन्नर आहेत. त्यांच्यामुळे आम्ही बदनाम होते. ते लहान मुलांना चोरतात ,पुण्याला नेतात असा दावा या किन्नरांनी पत्रकारांशी बोलतांना केला. यावेळी जळगाव जामोद येथे ज्या तृतीयपंथीयाला मारहाण करण्यात आली होती ते सुद्धा हजर होते. नकली किन्नरांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी या किन्नरांनी केली.