खळबळजनक..! १७ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून, नंतर तलावात फेकले! मेहकर तालुक्यातील धक्कादायक घटना

 
dongav
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आधी गळा दाबून खून करण्यात आला, त्यानंतर तिचा मृतदेह पाझर तलावात फेकून देण्यात आला. मेहकर तालुक्यातील मोळी येथे ही घटना समोर आली आहे.

मोळी येथील मयुरी मनोज वानखेडे(१७) ही ८ नोव्हेंबर पासून घरातून बेपत्ता होती. तिचा सगळीकडे शोध घेऊनही ती सापडली नव्हती. दरम्यान ११ नोव्हेंबरला गाव परिसरातील पाझर तलावात तिचा मृतदेह आढळला होता. चार दिवसांपासून प्रेत तरंगत असल्याने कुजलेले होते. त्यामुळे घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. दरम्यान मुलीचा मृत्यू पाण्यात बुडून नव्हे तर गळा आवळून खून केल्याचे उत्तरीय तपासणीच्या अहवालात समोर आले.  याप्रकरणी डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास ठाणेदार निलेश अपसुंदे करीत आहे.