गलेगठ्ठ पगार तरी घेतले ३ हजार ! सिंदखेडराजात कृषी सहाय्यक एसीबी च्या गळाला ; सरकारी कार्यालयाला भ्रष्टाचाराची वाळवी!

सिंदखेड राजा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक हरिभाऊ उत्तम डोणे रा. देऊळगाव राजा यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावे महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेत मंजूर झालेल्या पावर विडर व टॉप कटर या यंत्रसामुग्रीची मोक्का पाहणी करून वरिष्ठांना ऑनलाइन अहवाल सादर करण्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. दरम्यान लाभार्थ्यांनी तक्रार दिल्यावरून अँटी करप्शन ब्युरोने राजर्षी शाहू पतसंस्थे समोर सापळा रचला.३ तीन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई अँटी करप्शन ब्युरो बुलडाणा पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात विलास साखरे, विनोद लोखंडे, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, स्वाती वाणी, नितीन शेटे यांनी केली.
कारवाईवर एक नजर
नवीन वर्षात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांच्यावर कारवाई झाली होती. नवीन वर्षातील कृषी सहाय्यक वरील ही दुसरी कारवाई आहे. वर्षनिहाय अशी कारवाई झाली. वर्ष २०१७-१७, वर्ष २०१८-२०, वर्ष २०१९-१७, वर्ष २०२० मध्ये १४, वर्ष २०२१-१५, वर्ष २०२२-०८ असे लाचखोर पकडले.