आधी नवऱ्याचा खून केला आता अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या प्रियकराच्या बापाला धाडले यमसदनी! दगडाने ठेचून केली हत्या! बुलडाणा शहरातील ३७ वर्षीय महिलेचा कारनामा!

१५ वर्षांनी लहान असलेल्या तरुणासोबत सुरू होत्या लीला

 
gjnyghj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने ३७ वर्षीय महिलेने मित्राच्या मदतीने प्रियकराच्या बापाचा दगडाने ठेचून खून केला. ही  खळबळजनक घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. पोलिसांनी खून करण्याऱ्या आरोपीसह सूत्रधार महिलेला अटक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेवर याआधीच स्वतःच्या नवऱ्याचा खून केल्याचा आरोप आहे. सध्या ती जामिनावर बाहेर होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल,९ जुलै रोजी बुलडाणा शहरातील पुरभे ले -आऊट परिसरात दिनेश बाबुराव आराख (४२) हा गंभीर जखमी अवस्थेत सापडला होता. रात्री उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस तपासात दिनेश आराख याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी वेगवान तपास करीत या खुनाचे गुढ उकलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक दिनेश आराख यांना दोन मुले आहेत. त्यातील २३ वर्षीय निलेश आराख याचे गायरान परिसरातील विधवा महिला लीला गजानन सरोकर(३७)  हिच्याशी दोन महिन्यांपासून अनैतिक संबंध होते. या संबंधाची माहिती मृतक दिनेश आराख यांना कळल्याने  माझ्या मुलाचे आयुष्य बरबाद करू नको अशी समज त्यांनी महिलेला दिली होती. दिनेश आराख यांचे महिलेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे दिनेश आराख बद्दल महिलेच्या मनात प्रचंड राग होता.

 एव्हढे होऊनही महिला आणि निलेश यांच्यात अनैतिक संबंध सुरूच होते. दरम्यान अनैतिक संबंधात निलेशचे वडील अडथळा ठरत असल्याने त्यांचा काटा काढायचाच हा विचार लीलाबाई च्या मनात पक्का ठरला होता. तिने याबद्दल तिचा मित्र सागर मगर याला सांगितले होते. सागर मगर याने लिलाबाईच्या सांगण्यावरून दिनेश आराखच्या खुनाचा कट रचला. काल संध्याकाळी सागरने दिनेश आराख यांना भरपूर दारू पाजली आणि दगडाने ठेचून त्याला फेकून दिले.

दिनेश मेला असे समजून सागर घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान परिसरातील काहींना दिनेश गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी गोपनीय व तांत्रिक तपासाच्या आधारे वेगवान तपास करून या खुनाचा छडा लावून आरोपी सागर मगर आणि  लीलाबाई सरोजकार हिला अटक केली आहे.  पुढील तपास बुलडाणा पोलीस करीत आहेत.