कर्जाचा डोंगर वाढल्याने अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या! नागपंचमी सणाच्या पहाटेची दुर्दैवी घटना

 
faas
जळगाव जामोद ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. आज, २ ऑगस्टच्या पहाटे नागपंचमी सणाच्या दिवशीच कर्जबाजारी अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध येथे ही घटना घडली. ओंकार ज्ञानदेव सोनोने(५३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सोनोने हे अल्पभूधारक शेतकरी होती. गेल्या काही वर्षांपासून सततची नापीकी असल्याने ते त्रस्त होते. त्यासोबतच कर्जाचा डोंगर वाढत असल्याने ते चिंतेत होते. या तणावात त्यांनी आज, २ ऑगस्टला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.