दारूच्या नशेत धोक्याच्या वळणावरून गाडी सुसाट! धोकाच होणार ना..! घाटनांद्रा वळणावर दोघे तरुण गंभीर

 
tyi7y
जानेफळ( अनिल मंजुळजर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वळणावरून गाडी चालवताना नियंत्रणात चालवावी, दारू पिऊन गाडी चालवू नये असे कितीही नियम  माहीत असले तरी हे नियम पाळणाऱ्याची संख्या कमी आहे. जे नियम पाळत नाहीत त्यांना त्याचा फटकाही बसतोच. मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा वळणार  आज, २२ जुलैच्या सायंकाळी ५ वाजता भीषण अपघात झाला. दारूच्या नशेत गाडी सुसाट चालवणे दोघांना अंगलट आले.

देऊळगाव  साकर्शा येथील दोघे या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले. घाटनांद्रा ( संगम फाट्यावरील) वळणार सुसाट गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीवरून दोघे खाली पडले. मयूर महादेव गवळी(२२) व योगेश डीगांबर अवधूत(३२) अशी जखमीची नावे आहेत. दोघांवर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून या अपघातात मोटारसायकलीचे मोठे नुकसान झाले आहेत.-