पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू; सुलतानपूर येथील घटना

 
sfdvbg
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोहायला गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना लोणार तालुक्यातील सुलतानपूर येथे काल, रविवार २९ मे रोजी दुपारी घडली. राम गजानन सुरोशे (१७) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. यंदा त्याने दहावीची परिक्षा दिली होती.
प्राप्त माहितीनुसार सुलतानपूर येथील जुमडे यांच्या विहिरीत तो त्याच्या मित्रांसोबत पोहायला गेला होता. पोहत पाण्यात काहीतरी लागल्याने त्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरड गेल्याने गावातील लोक विहिरीवर जमा झाले. त्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.