'पीये तो शराबी लढखडाये, ना पिये तो सरकार!' थर्टीफर्स्ट साठी जिल्ह्यात २९ हजार ८०० परवाने ; मात्र अवैध पार्ट्यांवर राहणार वॉच!

 
uihk
बुलडाणा (प्रशांत खंडारे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ''पीये तो शराबी लढखडाए, ना पिये तो सरकार' ही वस्तुस्थिती आहे.दारूविक्रीतून सरकारला भरभक्कम महसूल मिळतो. दरम्यान थर्टी फर्स्ट उद्या येऊन ठेपल्याने या एक दिवसाकरिता मद्यपानासाठी परमिटरूम आणि देशी दारू विक्रेत्यांनी चक्क २९ हजार ८०० परवाने खरेदी केले असले तरी,थर्टीफस्टच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथक करडी नजर ठेऊन असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेताच होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

थर्टी फर्स्ट म्हटले की मांसाहार आणि दारू आलीच! दरम्यान या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उद्यापासून मद्यविक्री नवीन वर्षाच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले.वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने ही मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही या परवानाधारक मध्ये विक्रीच्या ठिकाणी सतत तपासणी केली जाणार आहे. मद्य पिण्याचा परवाना नसेल तर ग्राहकासह हॉटेल मालकालाही दंड केला जाईल. एका व्यक्तीला देशी दारू पिण्यासाठी ५ रुपयांमध्ये एक दिवसीय परवाना दिला जातो.आतापर्यंत जिल्ह्यात मद्यविक्री एकदिवसीय परवाने २९ हजार ८०० परमिट रूम आणि देशी रूम दारू विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.

काय म्हणतात एसपी भाग्यश्री जाधव?

सार्वजनिक मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे.परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते. यासाठीची वयोमर्यादा ही २१ वर्षे आहे. हा परवाना १ दिवस आहे.या थर्टी फर्स्टला मद्यप्राशनासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलडाणा कडून २९ हजार ८०० परवाने दिले. थर्टी फर्स्टला शहरात मद्यविक्री आणि परमिट रूम पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे.मद्यसेवन परवाना नसल्यास मद्यपींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे भाग्यश्री जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षा अखेरची कारवाई

१ जानेवारी २०२२ ते २९ डिसेंबर  २०२२ दरम्यान अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण १२७९ गुन्हे नोंदविण्यात आले.११७६ वारस गुन्ह्यात १२२५ आरोपींसह ९५ वाहने जप्त जप्त करून एकूण १६९४१४७९ मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.