पोट दुखत असल्याने डॉक्टरने सोनोग्राफीचा सल्ला दिला; १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने नंतर खर खर सांगितलं! कुटुंबीयांना धक्काच बसला ; खामगावच्या सुरजने तिच्यासोबत...

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव  शहरातील दाळफैल भागातील  १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गेल्या काही दिवसांपासून पोट दुखत होते. पोटात प्रचंड वेदना होत असल्याने तिला अपेंडिक्स असावा असे घरच्यांना वाटले. घरच्यांनी तिला डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र सोनोग्राफी करण्यापूर्वीच मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला. ते ऐकून तिच्या आईवडिलांना प्रचंड धक्का बसला.!

 त्याचे झाले असे की,पीडित अल्पवयीन मुलीशी खामगावच्या दाळफैल भागातील सूरज श्याम हेलोडे(२३) या तरुणाने मे महिन्यापासून जवळीक वाढवली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अल्पवयीन मुलगी गोड गोड बोलणाऱ्या सुरजच्या जाळ्यात अलगद फसली. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरे कुणीच नाही, मी तुझ्याशीच लग्न करणार असा शब्द सुरजने तिला दिला. मात्र सुरज चे प्रेम नसून ती केवळ वासना आहे हे पीडित मुलीच्या लवकर लक्षात आले नाही.

 दरम्यान काही दिवसांनी सुरजने तिच्याकडे शरिरसुखाची मागणी केली. तिची इच्छा नसतांना सुद्धा सूरजने प्रेमाच्या नावाखाली तिच्या शरीराचा अनेकदा उपभोग घेतला.  सूरजने केलेल्या सततच्या कारनाम्यामुळे त्याचा तो परिणाम झालाच आणि पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सुरज श्याम हेलोडे (२३) या तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.