भाई व्हायचे की शिपाई?तरुणांनो तुमचे तुम्हीच ठरवा! उद्यापासून पोलीस भरती प्रक्रिया;अनेकांवर पश्चातापांची वेळ

 
bharti
 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नवीन तरुणांना ईझी लाइफ हवं असतं, परिश्रमाच्या नोकरीची त्यांची तयारी नसते, तर    काही जीवतोड कष्ट उपसतात. अनेकांना वर्दीचे वेड आहे. बुलडाण्यात  उद्या,२ जानेवारीला ५१ जागेसाठी पोलीस शिपाईची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 

या व इतर नोकरीसाठी
हजारो तरुण इच्छुक आहेत,पण अनेक तरुणांनी हाणामारी, आंदोलन व गैर मार्गाने चूक केल्याने पोलिसांनी कायदेशीर गुन्ह्याचा ठपका ठेवल्याने त्यांच्यावर आता पश्चातापाची वेळ आली आहे.

 बहु प्रतीक्षेनंतर २०२१ ची बुलडाणा जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया २ जानेवारीपासून सुरू होणार आहे.२ जानेवारी ते १० जानेवारी २०२३ दरम्यान दररोज ५०० उमेदवारांची येथील पोलीस ग्राउंडवर विविध चाचणी होणार आहे. यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. या नोकरी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर,अनेक तरुणांचे वर्दीचे स्वप्न असले तरी ते पश्चाताप करीत आहेत.

'सदैव सैनिका पुढेच जायचे..'या ओळी आता त्यांच्यासाठी फक्त कवितेपुरत्याच राहिल्या आहेत.
त्याचे कारण ही तसेच आहे. अनेक तरुण दोस्ता मित्रांच्या वादात पडतात. हाणामारी करतात. कुणी राजकीय नेत्यांच्या प्रोत्साहनाला बळी पडून आंदोलनात जहाल भूमिका घेतात. तर कुणी भाईगिरीच्या नादाला लागते. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदविला की, त्यांच्या आयुष्यावर गुन्हेगारीचे चिन्ह लागून जाते. पुढे हा तरुण कुठल्याही नोकरीसाठी गेला तर, त्याचे चारित्र्य प्रमाणपत्र आधी तपासल्या जाते. पोलीस रेकॉर्ड कसे आहे?काही गुन्हा दाखल आहे का?असल्यास संबंधिताला नोकरीला मुकावे लागते. जिल्ह्यातील काही तरुणांना अशा गुन्हेगारीमुळे नोकरीसाठी मराठी देता येत नसल्याची दुर्दैवी खंत आहे.