जिल्हा कारागृह की कोंबड्यांचे खुराडे?! क्षमतेपेक्षा चौपट बंदीवान! ३९७ कैद्यांना कोंबले! ११७ जणांनी घेतलाय जीव

 
kragruh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हा कारागृहाची क्षमता 101 कैद्यांची असली तरी निव्वळ खूणाचे गुन्हे असलेल्या आरोपींची संख्याच 117 आहे. सद्यस्थितीत एकूण 397 कैदी कारागृहात बंद असल्याने,आणि दररोज कैद्यांच्या संख्येत  चढउतार होत असल्याने हे कारागृह की कोंबड्यांचे खुराडे असे म्हणण्याची वेळ आली आहे.

कायद्याच्या राज्यामध्ये कायदे हे जनतेच्या भल्यासाठी केले जातात. त्यामध्ये कायदा तोडल्याबद्दल शिक्षेची तरतूद असते. कायद्याच्या पालनासाठी शिक्षेची भीती वाटावी अशी अपेक्षा असते, म्हणजेच कायदा तोडल्यावर शिक्षा होईल आणि ती भीतिदायक असावी, अशी अपेक्षा असते. शिक्षा का द्यावी या संदर्भातील अनेक तत्त्वांमध्ये भीतिदायक शिक्षेचे एक तत्त्व आहे, तर दुसरीकडे पुनर्वसनात्मक शिक्षेचे देखील तत्त्व आहे. इंग्रजांच्या पूर्वीही जी पद्धत अस्तित्वामध्ये होती, त्यात सुद्धा शिक्षा ठोठविल्यावर कारागृहाची तरतूद होती. त्यानुसार विविध शिक्षा त्या-त्या प्रकारे अमलात आणल्या जायच्या.आताही शिक्षा ठोठावली जात आहे. मात्र गुन्हेगारीचा आलेख वाढतच चालला आहे. जेलमध्ये क्षमतेपेक्षाही जास्त कैदी असल्याचे उघड होत असून, कैद्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे त्यांना सोयीसुविधाही नीट मिळत नाही. 

376 पुरुष कैदी, 21 महिला

दरम्यान जिल्हा कार्यागृहातील कैद्यामध्ये 376 पुरुष कैदी आहेत तर,21 महिला बंदिवान आहेत. त्यापैकी 14 महिलावर खुनाचा आरोप आहे. खुनाच्या गुन्ह्यात 117 कैदी न्यायालयीन कोठडीत आहेत. शिवाय कारागृहात कर्मचारी वर्ग अपुरा आहे.कारागृहातील कैद्यांची संख्या वाढली, पण कर्मचारी वर्ग वाढला नाही. रिक्त जागा भरल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आज कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे.