जिल्हावासियांनो मार्केट मध्ये गुंतवणूक करून बक्कळ पैशाच्या आमिषाला बळी पडलात? तुमचीही फसवणूक झाली असेल तर "हे" करा..!

 
Nota
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तुम्ही मार्केट मध्ये एवढे रुपये गुंतवा ,रिक्स घ्या अन् दुप्पट, तिप्पट पैसे कमवा अशा जाहिराती सोशल मीडियावर, वर्तमानपत्रात, न्युज चॅनलवर अनेकदा प्रसिद्ध होतात. काहीजण त्यातून परतावा  सेवा देत असेल तरी अनेक जण यातून  गुंतवणूक करणाऱ्यांची फसवणूक करतात अशी माहिती "बुलडाणा लाइव्ह" ला प्राप्त झाली आहे. 

 विशेष म्हणजे होणाऱ्या व्यवहाराचे लीगल अग्रिमेंट केले जाईल असेही "मार्केट इन्वेस्टर" कडून सांगितल्या जाते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गुंतवणूक दारांनी लाखो रुपये गुंतवले. काहींना परतावा मिळाला असला तरी बहुतांश गुंतवणूकदारांना कोणताही परतावा मिळाला नसल्याचे "बुलडाणा लाइव्ह" ला सूत्रांनी सांगितले. 

   
 "हे करा"...!

 वर्तमानपत्रात किंवा न्युज चॅनल वर जाहिराती या जाहिरातदाराने जशा दिल्या तशा प्रकाशित करण्यात येत असतात.मात्र कुठल्याही जाहीरातींची सत्यता पडताळून त्याच्याशी आर्थिक व्यवहार करावा किंवा नको याचा निर्णय घ्यावा. असे होऊनही कुणाची फसवणूक झाली असेल तर जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला हवी. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येते हे विशेष..!!
  
मार्केट मध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये मिळविण्याच्या आमिषाला आपणही बळी पडला असाल तर अधिक माहितीसाठी:  8766847625  या क्रमांकावर संपर्क करावा..!