देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाट्यावर रक्तपात! तलवार, चाकूने दोन गटात खुपसा खुपशी! तिघे गंभीर जखमी; परस्परविरोधी तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

 
andhera
देऊळगावराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  देऊळगाव राजा तालुक्यातील सरंबा फाट्यावरील मंडपगावात ४ ऑक्टोबरच्या रात्री एकाच समाजाच्या  दोन गटात तुफान राडा झाला. या हाणामारीत चाकू, तलवारी याने खुपसा खूपशी झाली. दोन्ही गटातील तिघे या राड्यात गंभीर जखमी झाले असून अंढेरा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

रशीदाबी पठाण अजमत अली पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचा तरबेज अली पठाण , हबीब अली पठाण यांच्यात जुना वाद आहे. ४ ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यातील शुल्लक वाद पुन्हा उफाळून आला. त्यात तरबेज अली आणि हबीब अली यांनी जमाव जमवून  रशीदाबी पठाण यांच्या घरात घुसून तलवारी, चाकू, लोखंडी रॉड याने रशिदाबी पठाण यांच्या पतीला व दोन मुलांना   जिवे मारून टाकण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तक्रारीवरून तरबेज अली, हबीब अली यांच्यासह मारहाण करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला.
   
 दुसऱ्या गटाकडून तरबेज अली पठाण हबीब अली पठाण यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार ते दुकानातून सामान घेऊन घरी जात असताना आरोपींनी त्यांना रस्त्यात अडवून आमच्यावरील ३०७ ची केस मागे घ्या नाहीतर तुम्हाला जीवाने मारीन अशी धमकी दिली व चापट्या बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. अशा तक्रारीवरून रफिक अली अजमत अली पठाण, समीर अली अजमत अली पठाण, अजमत अली महमूद अली पठाण, सय्यद जाकीर सय्यद सैयदान ( सर्व रा. मंडपगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.