मरण झाले स्वस्त..!जिल्ह्यात एका दिवसात तिघे देवाघरी! दोघांनी गळफास घेतला! एकाला लागला शॉक

खामगाव तालुक्यातील धापटी येथे ५५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोहन नथुजी सोळंके ( ५५, रा. गोंधनापूर, ता. खामगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रागाच्या भरात दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी घर सोडले होते. दरम्यान धापटी शिवारात बळीराम अवचार यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला काल, त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल .
दुसरी घटना संग्रामपूर तालुक्यातील पलसोडा येथे उघडीस आली. ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असलेल्या समाधान गुलगो (३५) या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.शाळेचे दफ्तर घेण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा लहान मुलाच्या निदर्शनास ते दृश्य दिसले. आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र अस्पष्ट आहे.
दरम्यान तिसरी घटनी अपघाताची आहे. मोताळा तालुक्यातील किन्होळा येथे विजेचा शॉक लागून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सुनील तुळशीराम वैराळकर असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घरकुल योजनेत नंबर लागल्याने ते त्यांचे जुने घरे पाडत होते. त्याच वेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा येथे उपचारासाठी आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.