धाड मध्ये धडाधड..! पशुधन विकास अधिकाऱ्याला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

 
jhgh
धाड( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्या लम्पी या चर्मरोगाचा धुमाकूळ सुरू आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र मिळावे,यासाठी राजीक सौदागर, रिजवान सौदागर, शेख अहमद अब्दुल रियाज सौदागर व एका अज्ञात आरोपीने पशुधन विकास अधिकाऱ्यांना मारहाण केली आणि शासकीय कामात अथळा निर्माण केला. याप्रकरणाची तक्रार पशुधन विकास अधिकारी डॉ. नितीन डोंगरसिंग देव्हाने यांनी धाड पोलीस ठाण्यात दिली.तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. देव्हाने धाड येथील  पशुवैद्यकीय दवाखान्यात कर्तव्यावर होते. त्याच वेळी आरोपी हे पॅनकार्ड व्हेरिफिकेशन व सत्यप्रत प्रमाणित करण्यासाठी आले. सध्या लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने आणि मृत जनावरांचे पडताळणी अहवाल करणे सुरू असल्याने कार्यालयाचा शिक्का बुलडाणा वरिष्ठ कार्यालयात असल्याचे सांगून सध्या पॅन कार्ड व्हेरिफिकेशन व सत्यप्रत  होऊ शकणार नसल्याचे डॉ. देव्हाने  यांनी आरोपींना सांगितले. परंतु शिक्का का नाही अशी हुज्जत घालून आरोपींनी डॉ.देव्हाने यांना मारहाण करीत फरफटत नेले. याशिवाय तू गावात नोकरी कशी करतो अशी धमकी देखील आरोपींनी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.