कोवळ्या वयातील सालीवर जडला दाजीचा जीव! लग्न कर म्हणे..! नकार मिळाला म्हणून सासू व सालीवर कोयत्याने केले वार! खामगाव तालुक्यातील घटना

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठीशी लग्न केल्यानंतर पत्नीच्या लहान्या बहिणीवर त्याचा जीव जडला. त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने सासुवर आणि सालीवर दबाव आणला. दोघींनी नकार दर्शविल्यावर रागाने लालबुंद झालेल्या जावयाने कोयत्याने सासूवर व सालीवर वार केले. या हल्ल्यात दोघी जखमी झाल्यात. खामगाव तालुक्यातील वरखेड येथे ही खळबळजनक घटना घडली.

प्राप्त माहितीनुसार निलेश शिवदास चौधरी(३०, रा.गारखेड, ता.जामनेर) याची वरखेड ही सासुरवाडी आहे. विवाहानंतर त्याचा जीव त्याच्या १७ वर्षीय अल्पवयीन सालीवर जडला. त्यामुळे नात्याचा मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आता लहानीशी सुद्धा लग्न करायचेच यासाठी त्याने सासुवर दबाव आणला. तसेच सालीला सोबत येण्यासाठी धमकी दिली. सासूने व साली ने लग्नाला नकार दिल्याने जावई आणि सासुमध्ये वाद झाला. या वादात जावयाने सासुवर कोयत्याने वार केले. यावेळी वाद सोडवायला गेलेल्या सालीच्या अंगावर सुद्धा त्याने कोयत्याने वार केल्याने दोघी गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.