झाडांच्या फांद्या छाटणे जीवावर बेतले! विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एकाचा मृत्यू; मोताळा तालुक्यातील खेडी पान्हेरा येथील घटना

 
vij
 बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  घरासमोरील झाडाच्या फांद्या तोडत असताना विद्युत तारांचा स्पर्श झाल्याने एका ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ३ जानेवारीला खेडी पान्हेरा गावात घडली. श्रीकृष्ण माणिकराव भगत (३५)  रा. खेडी पान्हेरा, तालुका मोताळा असे मृतकाचे नाव आहे. 

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. या गरजा भागवून सुखी व आनंददायी जीवन जगायचे, तर त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात विजेचा वापर ही अपरिहार्य बाब बनली आहे. परंतु विजेचा वापर सावधानी पूर्वक करायला हवा.ही अत्यावश्यक विद्युतशक्ती सुविधा देतेच पण चुकले की सोडत नाही. अशीच घटना मोताळा तालुक्यात पुढे आली आहे.श्रीकृष्ण माणिकराव भगत आपल्या घरासमोरील बदामाच्या झाडाच्या फांद्या कापत होते. त्यावेळी फांद्यामधून गेलेल्या विद्युत तारांचा स्पर्श होऊन त्यांना जोरदार विजेचा धक्का लागला. त्यांना नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे.