दोन जिगरी मित्रांत राडा!कारण वाचून तुम्ही डोक्याला हात लावाल.! चिखली तालुक्यात वाचा काय घडल..!

 
kraim2
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातील एका गावात पोळ्याच्या दिवशी चांगलाच राडा झाला. दोन जिगरी दोस्त एकाएकी हाणामारीवर उतरले..हे पाहून आजूबाजूचे लोक वाद सोडवायला धावत आले अन्  भांडणाचे कारण ऐकून सगळ्यांना डोक्यावर हात मारून घ्यायची पाळी आली. एकाने दुसऱ्याचा पेन हिसकला अन त्यावरून हे भांडण झाल्याचे समोर आले.

त्याचे झाले असे की दोघेही दोस्त एका ओट्यावर टवाळक्या करत बसले होते. बोलता बोलता एकाला दुसऱ्याच्या खिशाला लावलेला पेन चांगलाच आवडला. त्याने सरळ त्याचा पेन हिसकला..पण ज्याच्या खिशाला हा पेन होता तो त्याच्या गर्लफ्रेंड ने दिलेला असल्याने त्या पेनात त्याचा भलताच जीव..

त्यामुळे मी हा पेन देणार नाही, माझा पेन मला वापस दे अशी मागणी त्याने केली. आता मुद्दा दोस्ती श्रेष्ठ की प्यार यावर येऊन ठेपल्याने ज्याने हिसकला त्याने पेन द्यायला नकार दिला. बघता बघता गमंत म्हणून सुरू झालेला शिव्यांचा खेळ आता हाणामारीवर उतरला. दोघांनी एकमेकांना धो धो धुतले. भांडण  सुटल्यानंतर दोघांनीही पुन्हा गळ्यात गळे घातले अन शेजारच्या दारूच्या दुकानात निघून गेले. हे पाहून भांडण सोडवणारे एकमेकांकडे पाहतच राहिले...