नदीच्या अलीकडून पलीकडे जात होता, अंधारातच गाळात फसला शेतकरी; देऊळगावराजाच्या आमना नदीतील घटना..

 
deulgavraja
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   शेतातील मोटार चालू करण्यासाठी नदी ओलांडत असताना  गाळात फसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला.  देऊळगाव राजा शहराला लागून असलेल्या पिंपळनेर शिवारात काल, ३ नोव्हेंबरच्या रात्रीदरम्यान ही घटना घडली.

रामदास अंबादास रामाने (४२, रा.आंबेडकर नगर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार रामदास रामाने यांचे पिंपळनेर शिवारात आमना नदीच्या काठावर दोन्ही बाजूला शेत आहे. रात्रीच्या सुमारास मोटार चालू करण्यासाठी अलीकडील शेतातून पलीकडच्या शेतात जाण्यासाठी ते नदी ओलांडत होते. मात्र अंधारामुळे अंदाज चुकल्याने ते गाळात फसल्याने त्यांचा मृत्यू झाला. देऊळगावराजा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुंजकर करीत आहेत.