बैलांना निर्दयीपणे कोंबून नेणाऱ्या शाकिर खान विरुद्ध गुन्हा ! बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी अडवले वाहन! चिखली शहरातील खामगाव चौफुलीवरील घटना

 
kgju
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काही गोवंश कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती स्थानिक बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी खामगाव चौफुली येथे संशयित वाहनास अडवून विचारपूस केली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने  सदर बाब चिखली पोलिसांना कळवल्यावर अडवण्यात आलेले वाहन पोलीस स्टेशन मध्ये नेऊन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 बुलडाणाच्या दिशेने येणाऱ्या एका वाहनात कत्तली साठी काही गोवंश हे चिखली मार्गे अमडापुर येथे जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार दुपारी दीड वाजेदरम्यान खामगाव चौफुली येथे टाटा एस वाहन (एम एच 21, एक्स 3734) बजरंग दलाच्या तन्मय हिवरकर, गजानन क्षीरसागर, भारत सुर्वे, अक्षय पठ्ठे, यश सुर्यवंशी, आयुष खरपास व प्रथमेश अंभोरे यांनी अडविले. सदर वाहनात कोंबलेल्या अवस्थेत काही बैल त्यांना दिसून आले.

त्यांनी वाहनचालकास विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. संशय बळवल्यावर सदर कार्यकर्त्यांनी चिखली पोलीस स्टेशनला घडलेल्या प्रकारची माहिती दिली असता, चिखली पोलिसांनी वाहन पोलीस स्टेशन येथे आणून चालकाची कसून चौकशी केली.वाहनातून तब्बल 5 बैलं मिळून आलेत. पोलिसांनी वाहन चालक शाखीर खान मुनिर खान (वय 27 वर्ष) रा. अमडापूर याच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1)डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर वाहनातून मिळून आलेले बैलांना रात्री आठ वाजेदरम्यान साकेगाव रोडवर स्थित नवनाथ गोशाळा येथे ठेवण्यात आले आहे.