ऑटो व पीव्हीसी पाईप भरलेल्या बोलेरो मार्शल वाहनाची धडक ;नालीचा मोठा खड्डा अपघाताला कारणीभूत! बुलडाणा शहरातील घटना

 
jhyv
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येथील तहसील चौकात ऑटो व पीव्हीसी पाईप भरलेल्या बोलेरो मार्शल वाहनाची धडक होऊन दोन्ही वाहन पलटी झाल्याची घटना आज 21 डिसेंबरला सकाळी समोर आली. नालीचा मोठा खड्डा अपघाताला कारणीभूत ठरला. घटनेत कुणीही जखमी झाले नसून केवळ ऑटो व पीव्हीसी पाईपचे नुकसान झाले.

तहसील चौकात चारही मार्गावरील शहरातील वाहतूक सुरू असते. चौकातील सिग्नल जवळ असलेल्या नालीचा उघडा खड्डा मात्र नेहमीच धोकादायक ठरतो. याच खड्ड्यामुळे बुधवारी सकाळी एम एच 30 ए एफ 34 98 क्रमांकाचा ऑटो व पीव्हीसी पाईप भरलेल्या एम एच 19 सी वाय 6014 क्रमांकाच्या बोलेरो मार्शल वाहनाची धडक झाली. दरम्यान दोन्ही वाहने सिग्नलला धडकली. या अपघातात पीव्हीसी पाईप व आजचे 10 ते 15 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली नव्हती. दरम्यान नालीचे उघडे असलेले खड्डे अपघाताला घातक ठरत असून, याकडे नगर परिषदेने लक्ष पुरविण्याची मागणी प्रत्यक्षदर्शी करीत होते.