सिनेस्टाईल पाठलाग! फोरव्हीलर वाहन चोरणाऱ्यांवर झडप! ३ पैकी दोन फरार! लोणार पोलिसांची थरारक कारवाई..

 
iygy
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  दुचाकी असो की चारचाकी वाहन, जिल्ह्यात वाहन चोरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.१६ जानेवारीला लोणार येथून एक मालवाहू वाह चोरी गेल्याचा फोन खनखानताच नवनियुक्त पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांनी तपासाची दिशा देऊन लोणार पोलीस पथकाने सिनेस्टाईल पाटलाकडून वाहन चोरावर झडप घातली. २ आरोपी पकडण्यात यश आले तरी २ आरोपी फरार झाले आहे. आरोपीकडून १ बजाज डिस्कवर कंपनीची दुचाकी आणि १ मालवाहू वाहन मिळून साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोणार शहरातील ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणारे सलीम खान कलंदर खान यांचे एमएच २८ बीबी १६९० क्रमांकाचे अशोक लेलँड कंपनीचे चार चाकी मालवाहू वाहन कामामध्ये जवळ त्यांच्या कार्यालयासमोर उभे होते.१६ जानेवारीला पहाटे ४ वाजता हे वाहन चोरी गेल्याचे वाजता त्यांच्या निदर्शनास आले. लोणार पोलिसांचा दूरध्वनी खणखणला असता, वाहन चोराचा माग काढण्यात आला..

पोलीस हेड कॉन्स्टेबल अरूण खानपट्टे, संतोष चव्हाण,ज्ञानेश्वर निकस, हरिभाऊ ढाकणे, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर यांनी तत्परतेने तपास केला असता, चोरट्याचे वाहन वाशिम जिल्ह्यातील वाघी गावाचे लोकेशन मिळाले. दरम्यान वाघी गावाजवळच या वाहन चोराला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्यात आले. यावेळी आरोपी मोहम्मद मुदसिफ मोहम्मद युनूस रा. अकोला याला अटक करण्यात आली. तर २ आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. अटक केलेल्या आरोपीकडून बजाज डिस्कवर कंपनीची एक दुचाकी आणि मालवाहू वाहनअसा साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भादवीच्या ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरज काळे पो कॉ.नितीन खराडे तपास करीत आहे.