चोट्टयाहो सुधरा रे..! देऊळगाव राजा बस स्टँड वरून एसटी बसच चोरायचा प्रयत्न, पण..कसा फसला ते वाचा

 
st
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरटे कधी काय चोरायचा प्रयत्न करतील याचा नेम नाही. देऊळगावराजा बस स्टँड वरून चोरट्यांनी चक्क एसटी बस चोरण्याचा प्रयत्न केला. बस स्टँड वरून बस बाहेर नेली देखील,मात्र मध्येच काही अंतरावर बसचे सेंट्रल जॉईन तुटल्याने बस चोरट्यांनी रस्त्यातच उभी केली अन् चोरटे पसार झाले.

त्याचे झाले असे की, देऊळगाव राजा बस स्टँडवर रात्री बस उभी करून  चालक व वाहक विश्रांती कक्षात झोपले होते. रात्रीच्या वेळी बस क्रमांक ( एम एच ०७, सी ९३१३) ही मानव विकासची बस अज्ञात चोरट्यांनी गायब केली. सकाळी चालक वाहकाला जाग आली तेव्हा बस दिसली नाही. दरम्यान शोधा शोध केल्यानंतर एक मानव विकास ची एसटी बस देऊळगाव राजा चिखली रस्त्यावरील एच डी एफ सी बँकसमोर उभी असल्याचे समोर आली. याप्रकरणी देऊळगावराजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.