चायनीज मांजा विक्रेते पोलिसांच्या रडावर! खामगावात ५ विक्रेत्यांवर गुन्हे; जिल्हाधिकाऱ्यांनीही काढले बंदीचे आदेश

 
hhggg
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मकर संक्रांत जवळ आली की,अनेकांना पतंग उडविण्याचे वेध लागतात. प्रतिस्पर्ध्याची पतंग कापण्याची चढाओढ सुरू होते. परंतु पतंगीचा जीवघेणा नायलॉन मांजा माणसाच्या दुखापतीला कारणीभूत ठरतो.पक्षी देखील मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर आज बंदी असलेला ३३,०४० रुपयांचा चायनीज मांजा खामगाव पोलिसांनी जप्त करून,५ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खामगाव शहर डीपी पथकाने मोची गल्लीत केली. दरम्यान आज जिल्हाधिकारी तूम्मोड यांनी चायनीज मांजावर कायमस्वरूपी बंदी चे आदेश काढले आहेत.

         shelke

                              (जाहिरात👆)

बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मकर संक्रांत जवळ आली की,अनेकांना पतंग उडविण्याचे वेध लागतात. प्रतिस्पर्ध्याची पतंग कापण्याची चढाओढ सुरू होते. परंतु पतंगीचा जीवघेणा नायलॉन मांजा माणसाच्या दुखापतीला कारणीभूत ठरतो.पक्षी देखील मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर आज बंदी असलेला ३३,०४० रुपयांचा चायनीज मांजा खामगाव पोलिसांनी जप्त करून,५ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खामगाव शहर डीपी पथकाने मोची गल्लीत केली. दरम्यान आज जिल्हाधिकारी तूम्मोड यांनी चायनीज मांजावर कायमस्वरूपी बंदी चे आदेश काढले आहेत.बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मकर संक्रांत जवळ आली की,अनेकांना पतंग उडविण्याचे वेध लागतात. प्रतिस्पर्ध्याची पतंग कापण्याची चढाओढ सुरू होते. परंतु पतंगीचा जीवघेणा नायलॉन मांजा माणसाच्या दुखापतीला कारणीभूत ठरतो.पक्षी देखील मृत्युमुखी पडतात. या पार्श्वभूमीवर आज बंदी असलेला ३३,०४० रुपयांचा चायनीज मांजा खामगाव पोलिसांनी जप्त करून,५ विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई खामगाव शहर डीपी पथकाने मोची गल्लीत केली. दरम्यान आज जिल्हाधिकारी तूम्मोड यांनी चायनीज मांजावर कायमस्वरूपी बंदी चे आदेश काढले आहेत.

मकरसंक्रांत जवळ येताच पतंगबाजीला उधाण आले असून मांजाची मागणी वाढली आहे. आपली पतंग कटू नये म्हणून पतंगबाजांकडून चायनीज मांजाचा वापर होत आहे. यामुळे पशुपक्ष्यांसह लोकांचा जीव धोक्यात येत आहे. विशेषत: वाहन चालक मांजामुळे होणाऱ्या अपघातांना बळी पडतात. गळ्यात मांजा अडकून अनेकांना गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागते. कधी-कधी यामुळे एखाद्याचा जीवही जातो.विशेषत: वाहन चालकांना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे. कधी कुठून एखादा मांजा येऊन गळ्यात अडकेल आणि गंभीर दुखापतीला सामोरे जावे लागेल सांगता येत नाही. लोकांचे जीवावर बेतत असतानाही पोलिस व प्रशासन नायलॉन मांजाची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई का करत नाही असा प्रश्न काही संघटनांनी रेटला आहे. दरम्यानचायनीज मांजा विक्रेते पोलिसांच्या रडावर आहेत.११ जानेवारीला खामगाव शहर ठाण्याच्या डीबी पथकातील सहाय्यक फौजदार मोहन करटुले, दिनेशसिंग इंगळे,गणेश कोल्हे, राम धामोडे, गणेश कोकाटे, अमरदीप सिंह ठाकुर, प्रफुल्ल टेकाळे, वसतकार, हिवाळे यांनी मोची गल्ली छापेमारी केली. दरम्यान महेश दिनेश पवार, मुकेश चंपालाल चव्हाण, रतन चंपालाल चव्हाण, जितेंद्र उत्तमचंद गोयल, सुनील अमरचंद पवार सर्व रा. मोची गल्ली खामगाव यांच्यावर कलम ३३६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून ३३०४० रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला. पतंग उडविण्यासाठी चायनीज मांजाचा वापर करू नका, असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.