पोराबाळांनो फटाके फोडतांना काळजी घ्या; मलकापूरात "रॉकेट" फटाक्यामुळे वाचा काय घडल..!
Wed, 26 Oct 2022

मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रॉकेट फटाक्यामुळे मलकापूरातील आदर्श नगर परिसरात आग लागल्याचा प्रकार समोर आलाय.
सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. दरम्यान काल रात्री मलकापूरात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. यात कुणीतरी लावलेले एक रॉकेट वर जाऊन फुटले व एकनाथ लक्ष्मण खर्चे यांच्या घराच्या गच्चीवर येऊन पडले. यामुळे गच्चीवर ठेवलेल्या लाकडांनी पेट घेतला, पाण्याची टाकी जळाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, अग्निशामक दलाला पाचारण करून आग आटोक्यात आणली.