कारचे टायर फुटले; दुचाकीला धडकली, पिता ठार; पुत्र गंभीर! राजूर घाटातील घटना..!

 
buldana ps
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव वेगात असलेल्या कारचे अचानक टायर फुटल्याने कार अनियंत्रित होऊन विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार तर एक गंभीर झाल्याची घटना बुलडाणा मलकापूर रस्त्यावरील राजूर घाटात  घडली.

मोताळा तालुक्यातील मूर्ती येथील रहिवासी अशोक सखाराम मक (५५) हे मुलगा सचिन(२५) याच्यासोबत बुलडाणा येथे येत होते. त्याचवेळी विरूद्ध दिशेने येणाऱ्या कारचे उतारात टायर फुटल्याने अनियंत्रित झालेली कार दुचाकीला धडकली. यात अशोक मक यांचा मृत्यू झाला असून मुलगा सचिन मक याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.