बुलडाण्यात पुन्हा खुपसा - खुपशी! स्वतःला डॉन सिद्ध करण्यासाठी पोटात खुपसला चाकू

 
chaku
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील तरुण दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे वळत असल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यात जयस्थंभ चौकाजवळील गजानन टॉकीज परिसरात दोन गटात चाकूहल्ला झाला होता. त्यातील दोघांवर उपचार सुरू असतांनाच पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्चस्वातून एकाच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. विशेष म्हणजे आज, २८ ऑगस्ट रोजी भरदिवसा शहरातील वर्दळ असलेल्या इकबालनगर भागात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अली उर्फ अबू बसर याने सय्यद समीर सय्यद युसुफ  याच्या पोटात धारदार चाकू खुपसला. यामध्ये समीर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुन्हेगारी वर्चस्वातून स्वतःला डॉन सिद्ध करण्यासाठी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. जखमी समीरचा जबाब नोंदविल्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.