७ वर्षांपूर्वी पोरगी घेऊन पळाला होता, दोन लेकरांचा बाप झाल्यावर अडकला बुलडाणा पोलिसांच्या जाळ्यात! चिखली तालुक्यातील मेरा खुर्दचा आहे आरोपी

 
hgjy
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  २०१५ मध्ये  गावातीलच अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व बुलडाणा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने बेड्या ठोकल्या. नवनीत घनश्याम गुजर (३२, रा.मेरा खुर्द, ता. चिखली)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
   

 नवनीत ने २०१५ मध्ये गावातीलच एका अल्पवयीन मुलीला २०१५ मध्ये पळवून नेले होते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नवनीत विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र नवनीत आणि अल्पवयीन मुलगी पोलिसांना मिळून आली नाही.

 दरम्यानच्या काळात नवनीत ने त्या मुलीशी लग्न करून संसार थाटला असून सध्या तो लेकरांचा बाप आहे. मात्र असे असले तरी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान आज तो बुलडाणा येथे येणार असल्याची माहिती बुलडाणा शहर पोलिस स्टेशनच्या डी. बी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक निलेश लोधी व स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक लेकुरवाळे व जगदेव टेकाळे यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नवनीतला अटक केली.