बुलडाणा शहर हादरले! गळा चिरून एकाचा खून..! शहरातील शिवाजी शाळेजवळील घटना

 
jhghj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा शहरातील शिवाजी शाळेजवळ  काल,रात्री १० वाजेच्या सुमारास एका जणाचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. हा खून कुणी आणि का केला हे अद्याप समोर आले नाही. संतोष दत्तात्रय जाधव (४५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
         जाहिरात

 ghube
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील वर्दळीचा परीसर असलेल्या शिवाजी शाळेच्या परिसरात कुणीतरी अज्ञात आरोपीने संतोष जाधवच्या गळ्यावर धारधार शस्त्राने वार केले. त्यामुळे संतोष रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनास्थळीच त्याची मृत्यू झाला. परिसरातील काहींच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर माहिती पोलिसांना देण्यात आला. 
  
  घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ही घटना घडली तेव्हा शहरात रिमझिम पाऊस सुरू होता, त्यामुळे मृतक संतोष जाधव यांच्या अंगावरील कपडे ओलेचिंब झाले होते.  दरम्यान बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीविरुद्ध  खुनाचा दाखल केला असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहे. हा खून कुणी आणि का केला याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे.