ब्रेकिंग ! अधिक्षकासह चौकीदार निलंबित!! आश्रमशाळा विध्यार्थ्याचे अपघाती मृत्यू प्रकरण

 
mmmm
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नजीकच्या येळगाव येथील आदिवासी आश्रमशाळातील  विध्यार्थ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अधीक्षक व चौकीदाराला संस्थेने तात्काळ सेवेतून निलंबित केले आहे.  विध्यावर्धिनी शिक्षण  व क्रीडा प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती शकुंतलाताई शिंदे यांनी रविवारीच या कारवाईचे आदेश दिले आहे.

bade

संस्था अध्यक्षा व सचिब यांनी या घटनेनंतर तात्काळ मुख्याध्यापकांकडूनया दुर्घटनेचा अहवाल मागविला. यानंतर प्राथमिक चौकशीनंतर रोशन रमेश दुबे( रा. निमखेड ता. जळगाव जामोद) या 7 वर्षीय विध्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूसाठी अधीक्षक अंकुश ब्रिजलाल जाधव व चौकीदार निलेश जाधव यांना  तात्काळ निलंबित केले आहे.

संस्थेने या कारवाईची माहिती एकात्मिक आदिवासी प्रकल्पचे अप्पर आयुक्त ( अमरावती) , प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास  प्रकल्प अकोला यांनाही सादर केली आहे.  संस्थेने मुख्याध्यापकाना,  घटनेच्या वेळी  उपस्थित कर्मचाऱ्यांची माहिती, घटनेचा तपशील यावरील अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते, हे येथे उल्लेखनीय.