एका मुलीवर दोघांचा डोळा! एकाने तिच्या बॅगमध्ये मोबाईल टाकला, दुसऱ्याने चिठ्ठी दिली! ती दुसऱ्याशी फोनवरून बोलल्याने पहिल्याला आला राग, तिला म्हणे तुझे गावात एक नाही दहा लफडे! खामगाव तालुक्यातील घटना!

 
kraim
खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकाच अल्पवयीन मुलीवर दोन जणांची वाईट नजर होती..ते दोघेही तिला वारंवार त्रास देत होते. माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू दुसऱ्या कुणाशी बोलू नको अशा धमक्या दोघेही देत होते. अखेर दोघांच्या त्रासाने कंटाळून तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. खामगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय मुलीने याप्रकरणाची तक्रार दिली आहे. अटाळी येथील २५ वर्षीय शेख गुलाब शेख अफसर हा ती शाळेत जात असतांना वारंवार पाठलाग करत होता. तू माझ्याशी बोलत का नाही, माझे तुझ्यावर खूप  प्रेम आहे असे म्हणत त्याने तिच्या शाळेच्या बॅगमध्ये मोबाईल टाकला होता. तू माझ्याशी बोलली नाही तर मी जीवाचे बरे वाईट करेन अशी धमकी शेख गुलाबने दिली होती. दरम्यान अटाळी येथील अजीस शहा अनिस शहा (२०) याने मुलगी अंगणात झाडत असताना तिच्या हातात त्याचा मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी दिली होती. तिने अजीसला फोन केल्यावर तू शेख गुलाब सोबत कशाला बोलते माझ्याशी बोलत जा असे अजीस तिला म्हणाला होता.

दरम्यान मुलीला मोबाईल देणाऱ्या शेख गुलाब याला ही बाब माहीत झाल्यावर त्याने पुन्हा तिला फोन केला. तू अजीस सोबत कशाला बोलली, तुझे गावात एक नाही दहा लफडे आहे असे म्हणत त्याने शिवीगाळ केली..दोघांच्या जाचाने त्रस्त झालेल्या पिडीतेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून तिच्यावर डोळा ठेवणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.