बोलेरो पिकअप आणि स्विफ्ट डिझायरची धडक; देऊळगावमहीचे दोघे गंभीर; चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावरील घटना..!

 
kjgbh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भरधाव बोलेरो पिकअप आणि स्विफ्ट  डिझायरची धडक झाल्याने दोघे गंभीर झाले. चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावर आज, ५ नोव्हेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले दोघेही देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगावमही येथील राहणारे आहेत.

प्राप्त माहितीनुसार स्विफ्ट डिझायर देऊळगाव मही कडून चिखली कडे तर बोलेरो पिकअप चिखली कडून डोलखेड ( ता. जाफ्राबाद) कडे जात होते.  मलगी फाट्यावर असलेल्या मैत्री टी सेंटर पासून २० फुटांच्या अंतरावर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर बोलेरो चालक वाहन उभे करून घटनस्थळा वरून पसार झाला. या अपघातात कार मधील वसीम नसीम सय्यद (३०) व आशिष खिल्लारे(३०, दोघेही रा.देऊळगाव मही) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना चिखली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.