बोलेरो पिकअप ने ऑटोला उडवले! देऊळगाव घुबे येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू! चिखली शहरातील घटना..!!

 
kjndf
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बोलेरो पिकअपने ऑटोला दिलेल्या धडकेत सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला. काल, ५ ऑक्टोबरला सकाळी ६ चिखली शहरातील खंडाळा चौफुलीवर ही घटना घडली. बळीराम कोंडुजी घुबे( ८२, रा.देऊळगाव घुबे) असे अपघातात ठार झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे.

 प्राप्त माहितीनुसार बळीराम घुबे हे सेवानिवृत्त शिक्षक होते. चिखली येथील दळवी हॉस्पिटल मध्ये ते आजारपणामुळे भरती होते. काल, सकाळी त्यांना सुट्टी झाल्याने ऑटोने ते घराकडे जात होते. दरम्यान देऊळगावराजा कडून येणाऱ्या बोलेरो पिकअप ने  ऑटोला जबर धडक दिली. या धडकेत बळीराम घुबे  हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी चिखली शहरातील डॉ. जवंजाळ हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.