अज्ञात वाहनाने उडवले; चिखली येथील ज्येष्ठ शिवसैनिक भगवानराव वाळेकर यांचे निधन! चिखली जवळील घटना

 
kjg
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार चिखली येथील ज्येष्ठ शिवसैनिक भगवानराव वाळेकर यांचा मृत्यू झाला. चिखली बुलडाणा रस्त्यावरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ रात्री साडेसातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे चिखली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

 ज्वलंत हिंदुत्ववादी आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणुन भगवानराव वाळेकर यांची चिखली शहरासह परिसरात ओळख होती. काल, ८ डिसेंबरला सकाळी ते जाळीचा देव येथे दर्शनासाठी गेले होते. रात्री साडेसातच्या सुमारास घराकडे परतत असताना,घर अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता चिखली शहर व परिसरात कळताच सर्वत्र शोककळा पसरली.