शेतीच्या वादावरून दोन गटात रक्तपात! महिलेच्या अंगावरील कपडे फाडले; परस्परविरोधी तक्रारीवरून १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल! देऊळगाव राजा तालुक्यातील घटना

३० वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार तिला व तिच्या घरच्यांना शेतात जातांना रस्त्यात अडवण्यात आले. यावेळी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून महिलेला व तिच्या पतीला मारहाण केली. गणेश रमेश आंधळे याने महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून महिलेच्या अंगावरील कपडे फाडले अशा तक्रारीवरून गणेश रमेश आंधळे,रवींद्र सौदाजी आंधळे, गणेश धोंडीबा आंधळे, संदीप बबन आंधळे, शरद मारुती गीते ( सर्व रा. पिंप्री आंधळे, ता. देऊळगावराजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
दुसऱ्या गटाकडून रमेश आनंदा आंधळे यांनी तक्रार दिली. शेतीच्या वादावरून आरोपींनी लाठ्या काठ्या घेऊन रमेश आंधळे व कुटुंबियांना मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून समाधान काशिनाथ आंधलेब, सहदेव महादेव नागरे, गणेश ज्ञानदेव नागरे, काशिनाथ सखाराम आंधळे, रेखा गणेश नागरे, विद्या सहदेव नागरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास उगले करीत आहेत.