भरधाव एसटीने दुचाकीला उडवले! सेवानिवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू! पत्नी गंभीर जखमी! आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी जात होते! बेराळा फाट्यावरील घटना

चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भरधाव एसटीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार सेवा निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. चिखली देऊळगावराजा रोडवरील बेराळा फाट्याजवळ आज, १० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. श्रीकिसन गुलाबराव मोरे(५९, रा. दिवठाणा, ता.चिखली, हमु शिक्षक कॉलनी, शेलुद) असे अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार श्रीकिसन मोरे व त्यांची पत्नी दोघे स्कूटीने आषाढी एकादशीनिमित्त दर्शनासाठी जांभोरा येथे जात होते. बेराळा फाट्याजवळ औरंगाबाद कडून चिखली कडे जाणाऱ्या एसटी बसने दुचाकीला जबर धडक दिली. या भीषण अपघातात श्रीकिसन मोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अपघातास कारणीभूत ठरलेल्या बस चालकाविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मृतक श्रीकिसन मोरे यांच्या पश्यात पत्नी , १ मुलगा व २ मुली असा परिवार आहे.