सावधान! लहान मुलांना चॉकलेट खाऊ घालताना जरा जपूनच! श्वसनलिकेत चॉकलेट अडकल्याने धाड येथे ५ वर्षीय मुलाचा मृत्यू

 
yuggh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चॉकलेट म्हणजे लहान मुलांचा आवडता पदार्थ. मात्र याच चॉकलेट मुळे धाड येथे एका ५ वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेला आहे. २९ सप्टेंबर रोजी ही घटना घडली.

 धाड येथील शेख अजीम यांचा ५ वर्षीय मुलगा शेख याहिया हा काल नेहमीप्रमाणे चॉकलेट खात होता. दरम्यान हे चॉकलेट त्याच्या श्वसननलिकेत अडकले. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होऊ लागल्याने तो अत्यवस्थ झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तातडीने धाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच याहीया चा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.