महिलांच्या शौचालयात बेवडा घुसला, चपलेने धो धो धुतला! खामगाव बसस्थानकावरील घटना
Updated: Oct 27, 2022, 17:19 IST

खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महिलांच्या शौचालयात घुसलेल्या एका बेवड्याला उपस्थितांनी धो धो धुतल्याचा प्रकार समोर आलाय. काल, भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी खामगाव बसस्थानकावर हा प्रकार घडला.
त्याचे झाले असे की काल, भाऊबीज असल्याने खामगाव बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ होती. त्याचवेळी एका बेवड्याने बसस्टँडवर धिंगाणा घातला. दारूच्या नशेत तो बसस्टँडवर असलेल्या महिलांच्या शौचालयात घुसला. ही बाब महिलांच्या लक्षात येताच त्याला चपलेने धो धो धुतले. उपस्थित नागरिकांनी सुद्धा यावेळी हातसफाई करून घेत बेवड्याला बेदम बदडले.