थर्टी फर्स्टच्या आधीच मलकापूरात १० लाखांच्या देशी - विदेशी दारूने भरलेल्या १२ हजार बाटल्या फोडल्या ..! वाचा प्रकरण नेमके आहे तरी काय?
Dec 30, 2022, 09:56 IST
मलकापूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागाच्या वतीने अवैध दारूवर वॉच ठेवल्या जातो. अनेक कारवायांमध्ये पोलीस तो माल जप्त करतात. मात्र अशा जप्त केलेल्या साठ्याचे होते तरी काय असा प्रश्न अनेकांना पडत असतो. मलकापूर शहर आणि तालुक्यात वेगवेगळ्या कारवाया करून पकडलेली १० लाख रुपयांची दारू आता पोलिसांनी नष्ट केली आहे.
२०१७ पासून तर २०२१ या कालावधीत अवैध दारूच्या १३५ गुन्ह्यांतील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. देशी व विदेशी दारूच्या साधारणतः १२ हजार बॉटल पोलिसांनी नष्ट केल्या आहेत. जेसीबीच्या मध्यातून सगळ्या बॉटल फोडण्यात आल्या. मलकापूर नगरपरिषदेच्या डंपिंग ग्राउंड मध्ये ही कारवाई करण्यात आली . न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. ठाणेदार विजयसिंह राजपूत, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे किशोर पाटील यांच्यासह इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.