तुमच्यामुळे मला चोऱ्या कठीण झाले,मी एकाएकाला संपवून टाकीन! बुलडाण्यात चोराची धमकी!

 
buldana
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दरम्यान बुलडाणा शहरातील पाठक गल्लीत असलेल्या एका घरात घुसून  एका चोरट्याने जिण्याला लावलेले काच फोडले. तुमच्यामुळे मला चोऱ्या करणे कठीण झाले आहे, मी एकाएकाला संपवून टाकीन अशी धमकी देखील त्याने घरमालक तरुणाला दिली. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात बुलडाणा शहरातील पाठक गल्लीत राहणाऱ्या आकाश ठाकूर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुवर्णा रवींद्र कुळकर्णी (४४, रा. पाठक गल्ली,बुलडाणा) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. २२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता त्यांचा मुलगा व्यंकटेश व सासू सासरे घरी असता आकाश ठाकूर घरात घुसला. त्याने जिण्याला लावलेले टावरचे काच फोडले व ७ हजार रुपयांचे नुकसान केले.

त्यानंतर घराच्या बाहेर जावून व्यंकटेश कुलकर्णी याला शिवीगाळ केली. तुमच्यामुळे मला चोऱ्या करणे कठीण झाले आहे, एकाएकाला संपवून टाकीन अशी धमकी आकाश ठाकूर याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी आकाश ठाकूर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.