अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर! मेहकर तालुक्यातील घटना

 
bbbb
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. मेहकर तालुक्यातील वडाळी येथे ही घटना घडली.

 विनोद भाऊराव सातपुते(४५, रा वडाळी, ता.मेहकर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मांडवा समेट डोंगर शिवारात शेती ठोक्याने केली आहे. दुपारी शेतात काम करीत असताना अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी स्वतःला वाचविण्यासाठी त्यांनी मालोच्यावर चढण्याचा प्रयत्न केला मात्र अस्वलाने त्यांना खाली खेचून हाताला व मांडीला चावा घेत गंभीर जखमी केले.

आरडाओरड करून त्यांनी कशीबशी अस्वलाच्या तावडीतून सुटका करून घेतली . स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांना उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविले. जखमी शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.