बाप्पा बाप्पा; तब्बल सव्वा कोटींची कारवाई; उपविभागीय अधिकारी भूषण अहिरेंची अवैध रेती साठ्यांवर धाड! ५ बोटी,२ पोकलॅण्ड, २ टिप्पर अन् ५४० ब्रास अवैध रेती जप्त

 
ujgh
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे आज ,१२ डिसेंबरला अवैध रेती उत्खनन आणि साठा करणाऱ्यांवर अक्षरशः तुटून पडले. आता खुद्द उपविभागीय अधिकारी मैदानात उतरल्याने देऊळगाव राजाच्या तहसीलदारांनाही मैदानात उतरावेच लागले. रेतीचा अवैध साठा करून ठेवणाऱ्या ५ जणांविरुद्ध कारवाई करून त्यांना १ कोटी ३६ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस व परिसरातून ५ बोटी,२ पोकलॅण्ड, २ टिप्पर आणि तब्बल ५४० ब्रास रेती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जप्त करण्यात आली.  ज्ञानेश्वर वाघ, मंदाकिनी पराड, मनेश वाघ, संजय शंकर पराड, भास्कर महादेव लाड यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.  या मोठ्या कारवाईमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.