BREKING चिखलीत हॉस्पिटल हाऊसफुल्ल! भगर खाल्ल्याने विषबाधा.दवाखान्यात गर्दी मावेना

 
hvh
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. एकादशी निमित्त भगर किंवा भगरीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्याने  अनेकांना विषबाधा झाली. चिखली तालुक्यातील विविध गावांतून जवळपास ५० पेक्षा अधिक रुग्ण विविध खासगी रुग्णालयात भरती आहेत.

 काल, २१ सप्टेंबर ला एकादशी होती. त्यानिमित्ताने पॅकिंग केलेल्या भगरीच्या पिठापासून बनवलेली भाकरी खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे समोर येत आहेत. रुग्णालयात दाखल झालेल्या जवळपास  सगळ्याचं रुग्णांना एकसमान लक्षणे असल्याचे समोर आले. उलट्या होणे, मळमळ होणे, पोटात दुखणे, हात - पाय थरथरणे, ताप डोकेदुखी अशी लक्षणे या रुग्णांना आहेत.  डॉक्टरांनी रुग्णांची चौकशी केली असता दुकानातून आणलेल्या पॅकिंग भगरीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे समजते. 

 चिखली पोलिसांनी देखील रुग्णालयात जाऊन याप्रकरणाचा पंचनामा केला आहे. हे भगरीचे पीठ कोणत्या दुकानातील होते? किती दिवसांचे होते याचा तपास पोलिसांना व प्रशासनाला करावा लागणार आहे. येणाऱ्या काळात नवरात्री असल्याने अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात .त्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.