BREKING खळबळजनक! स्प्राईट मध्ये गुंगीचे औषध टाकून आरोग्य सेवकाने आरोग्य सेविकेची इज्जत लुटली! चिखलीतील मेहकर फाट्यावरील घटना

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विनोद खराटे सध्या खामगाव येथे आरोग्य सेवक पदावर कार्यरत आहे.२०१८ पासून त्याची पीडित आरोग्य सेविकेशी ओळख होती. तुला कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करता केसेस देतो असे म्हणत त्याने तिच्याशी जवळील वाढवली. त्यानंतर मेहकर फाटा परिसरातील बापूजी ट्रेडर्स दुकानाच्या मागील खोलीत स्प्राईट मध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला.
त्या संबंधाचे व्हिडिओ चित्रीकरण खराटेने केल्याचा आरोप पीडित आरोग्य सेविकेने तक्रारीत केला आहे. त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा जबरदस्ती शारीरिक संभोग केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. खराटे याची हिम्मत एवढी वाढली की त्याने पीडित महिलेच्या पतीला देखील अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्रास असह्य झाल्यानंतर पिडीतेने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी खराटे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण तळी करीत आहेत.