BREKING दादागिरी..! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखावर हल्ला; बुलडाण्यावरून बैठक आटोपून मोताळ्याकडे जात होते! स्विफ्ट कार मधून चौघे उतरले अन् लोखंडी रॉड ने..

प्राप्त माहितीनुसार तालुका प्रमुख अनंता दिवाणे व युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे हे बुलडाणा येथे पक्षाच्या बैठकीसाठी आले होते. २६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांची चिखली येथे सभा होणार आहे, या सभेच्या नियोजनाची बैठक जांभरून रोडवरील जनशिक्षण संस्थेत संपन्न झाली. बैठक आटोपून दोघे दुचाकीने मोताळ्याकडे जात होते. दरम्यान मूर्ती फाट्याजवळ बुलडाण्याकडून येणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर गाडीने दोघांना अडवले.
गाडीतून चौघे अज्ञात उतरले, चौघांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता. गाडीतून उतरलेल्या चौघांनी दोघांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्याने भांबावलेले दोघेही बाजूच्या शेतांमध्ये पळाले. या प्रकारानंतर हल्लेखोर पसार झाले. गंभीर जखमी दोघांना स्थानिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली. जिल्हा रुग्णालय परिसरात सध्या पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोर कोण होते हे मात्र दोघांना सांगता आले नाही.