BIG UPDATE कार क्रेनला लागून आली वर! मायलेकीचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी फोडला हंबरडा; तरुणाचा मृतदेहही निघाला विहिरीबाहेर;जिल्हा शोकसागरात...

 
jhg
देऊळगावराजा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार देऊळगाव राजा चिखली रोडवरील "त्या" अपघातातील तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून एक विशेष पथक शोधकर्यासाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान अपघात ग्रस्त कार क्रेनला लागून विहिरीबाहेर आली. कार व त्यामध्ये असलेले दोघा मायलेकिंचे मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

 दरम्यान पवन पिंपळे याचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.  देऊळगाव राजा येथील रामनगरात राहणारे शिक्षक अमोल मुरकुटे यांची पत्नी स्वाती मुरकुटे व चिमुकली सिद्धी या कारसह पाण्यात बुडाल्या होत्या. त्यानंतर बचाव कार्य करतांना  विहिरीत उतरलेला पवन पिंपळे या तरुणाचा गाळात फसल्याने मृत्यू झाला होता. विहिरीतून पाणी काढण्यासाठी प्रशासनाने पंप लावले होते. क्रेन विहिरीत सोडून कार वर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर रात्री आठच्या सुमारास कार क्रेनला अडकून वर आली. दोघी मायलेकिंचे मृतदेह कारमध्येच होते. ते पाहून घटनास्थळी नातेवाईकांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान तिघांचेही मृतदेह देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.