BIG BREKING 'बनायेंगे मंदिर' गाणे वारंवार वाजविण्यास पोलिसांचा मज्जाव! दोन गटात वाद, ३८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल! खामगाव तालुक्यातील प्रकार

 
khamgav

खामगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीत "बनायेंगे मंदिर" हे गाणे वारंवार वाजविण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याचा प्रकार समोर आलाय. विशेष म्हणजे पोलीसांच्या वतीने याप्रकरणाची तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याउलट अन्य दुसऱ्या एका गटानेही तक्रार दिली असून  त्यांच्या तक्रारीवरून मिरवणुकीचे आयोजन करणाऱ्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. खामगाव तालुक्यातील आवार येथे हा प्रकार समोर आला आहे.

            जाहिरात

ghube


 शेख अलिमोद्दीनशेख जैनोद्दीन (३६, आवार) यांनी  ५ आक्टोबर रोजी विशिष्ट समाजाच्या अज्ञात लोकांविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे.शेख अलिमोद्दीनशेख जैनोद्दीन यांच्यासह त्यांच्या समाजातील लोकांनी सुरक्षेच्या कारणाने ४ सी.सी. टी. व्ही कॅमेरे विकत आणून एक स्वतःच्या घरावर व इतर शेख युसूफ शेख मुसा तर दोन मदीना मस्जिद वर बसवले होते. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक गावांमध्ये फिरून शेख अलिमोद्दीनशेख जैनोद्दीन , शेख युसूफ शेख मुसा यांच्या घराजवळ आल्यानंतर घरावरील सी. सी. टी .व्ही कॅमेऱ्यांची काठीने दिशा बदलून ते उखाळून टाकून नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शेख अलिमोद्दीनशेख जैनोद्दीन यांना शिवीगाळ करून या लोकांचे घरे जाळून यांना खल्लास करून टाका , धमक्या दिल्या असेही शेख अलिमोद्दीनशेख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

  जाहिरात

 gupta
तर दुसऱ्या तक्रारीत पो. हे.कॉ सुनील राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त अशोक क्रीडा मंडळ आवार येथे मिरवणुकीत बंदोबस्तसाठी ते हजर असताना गावातील बाळकृष्ण सुखदेव गवई,आंनदा ज्ञानदेव गवई , दिलीप बोंद्राजी गवई ,देवप्रसाद निळकंठ गवई ,रामराव अर्जुन गवई, धम्मपाल बाबाराव गवई , शरद बाळकृष्ण गवई, महेंद्र इंगोले, संघपाल अजाबराव इंगोले, दिलीप देवमन गवई, संदिप गवई, शरद बाळकृष्ण गवई , अरूण मांजरे, व इतर २० ते २५ लोक   वाहन क्रंमाक (एमएच १८ एम १७३४) या टाटा वाहनात बॉक्स स्पिकर बॅन्जोवर वारंवार 'बनायेंगे मंदीर अवधपुरी का राम बनायेंगे' मंदीर असे गाणे वाजवित होते. त्यामुळे  पो. हे. कॉ राऊत यांनी व  सोबत असलेल्या अधिकऱ्यांनी गाणे वाजविणाऱ्यांना  मिरवणुकीत वारंवार हेच गाणे वाजवु नका अशा सूचना करीत होते. मात्र वरील लोक बॅन्जो वाजविणा-यास तेच गाणे वाजविण्याचे सांगत होते. लोकांनी पोलीसांनी दिलेल्या सुचनाचे पालन केले नाही. मिरवणुक एकाच ठिकाणी रेंगाळत ठेवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे आदेशाचे उल्लंघन केले असेही पो. हे. कॉ राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.