BIG BREKING धुऱ्याच्या वादावरून शेतकऱ्याचा खून! आज सकाळची खामगाव तालुक्यातील घटना! पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पाठलाग करून पकडले

 
hjn
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  धुऱ्याच्या  वादावरून शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज,२७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊला खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथे घडली. खून करणाऱ्या आरोपीला पिंपळगाव  राजा पोलिसांनी पाठलाग करून लगेच ताब्यात घेतले आहे.

 पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव तालुक्यातील तरोडानाथ येथील रघुवीर हरदास घोती (६५) आणि देवराम काशिराम वाघमोडे (६०) यांचे शेत शेजारी शेजारी आहे. आज सकाळी दोघेही शेतात असताना धुऱ्यावरून त्यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की देवराम काशिराम वाघमोडे याने रघुवीर घोती यांच्या छातीत विट फेकून मारली.
      
 वाघमोडे याने केलेला प्रहार एवढा घातक होता की रघुवीर घोती जे जागीच कोसळून ठार झाले. घोती यांचा खून केल्यानंतर वाघमोडे घटनास्थळावरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश आडे यांनी  पथकासह घटनास्थळी धाव घेतली. आरोपी वाघमोडे पळून जात असताना पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. वृत्त लीहिस्तोवर पुढील प्रक्रिया सुरू होती.