BIG BREKING जिल्ह्यात आज विजेचे तांडव! वेगवेगळ्या घटनेत विजा कोसळून एक शेतकरी ठार, चौघे गंभीर जखमी! दोन बैल दगावले..!

 
vij
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात आज, ११ ऑक्टोबर रोजी विजेचे तांडव सुरू आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असताना चार ठिकाणी विजा कोसळल्या आहेत. यात एक शेतकरी जागीच ठार झाला असून चौघे गंभीर जखमी आहेत. याशिवाय वेगवेगळ्या घटनेत दोन बैलांचा सुद्धा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.

 खामगाव तालुक्यातील पळशी बु   येथे वीज कोसळल्याने मोहन श्रीराम सांगोकार (३४) हे जागीच ठार झाले तर केशव मिठुलाल सांगोकार हे जखमी झाले आहेत. दुसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यात चिंचपूर येथे वीज कोसळल्याने कस्तुरबाई शालीग्राम मापारी (५०), शिवाजी शालीग्राम मापारी (३०), आश्र्विनी शिवाजी मापारी(२५) हे कापूस वेचण्यासाठी शेतात गेले असता अचानक वीज कोसळल्याने जखमी झाले.

तिसऱ्या घटनेत देऊळगाव राजा तालुक्यातील दिग्रस बु येथे वीज पडून एक बैल दगावला. चौथ्या घटनेत सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी येथील दत्तू पिराजी कापसे यांच्या मालकीच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान विजा कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.